कर्जमाफीची फक्त ५५३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर; तांत्रिक अडचणींमुळे विलंब, सहकार मंत्र्यांची माहिती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 23, 2026

कर्जमाफीची फक्त ५५३ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर; तांत्रिक अडचणींमुळे विलंब, सहकार मंत्र्यांची माहिती

दि. २४ :-

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील 

 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून, तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या टप्प्यात केवळ ५५३ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे एकूण २ कोटी ९९ लाख ३७ हजार ५४० रुपये कर्ज माफ करण्यात आले आहे. 

📑 पहिल्या यादीतील जिल्हानिहाय शेतकरी संख्या
प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax) करदात्या शेतकऱ्यांची माहिती मिळण्यास विलंब झाल्यामुळे, सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून उपलब्ध डेटाच्या आधारे प्राथमिक यादी जाहीर केली आहे. यामध्ये ७ जिल्ह्यांतील ५५३ शेतकरी समाविष्ट आहेत: 
ठाणे जिल्हा बँक: १८२ शेतकरी
लातूर जिल्हा बँक: १३३ शेतकरी
पुणे जिल्हा बँक: ८५ शेतकरी
अमरावती जिल्हा बँक: ५८ शेतकरी
सातारा जिल्हा बँक: ३८ शेतकरी
नागपूर जिल्हा बँक: १६ शेतकरी 
राज्यातील सुमारे ३२ लाख थकबाकीदार आणि २४ लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या अशा एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळणार आहे. 
मूळ कर्जमाफीसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ: यापूर्वीच्या २०१९ मधील महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांना सुरुवातीला ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. परंतु, सरकारने पुनर्विचार करून ती मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यासाठी अतिरिक्त ४,३९५ कोटी रुपये खर्च केले जातील. 
सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ही योजना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. शेतीव्यतिरिक्त इतर मार्गाने उत्पन्न मिळवून इन्कम टॅक्स भरणाऱ्या अपात्र व्यक्तींना यातून वगळण्यात येणार आहे. दिल्लीकडून प्राप्तिकर विभागाचा डेटा मिळण्यास तांत्रिक अडचण आल्यामुळे संपूर्ण याद्या जाहीर करण्यास वेळ लागत असून सध्या इतर याद्यांचे अपलोडिंग काम युद्धपातळीवर सुरू आहे. 
शेतकऱ्यांसाठी पुढील आवश्यक प्रक्रिया (KYC & AgriStack)
ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत येतील, त्यांना कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ थेट बँक खात्यात (DBT द्वारे) मिळवण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल: 
आपल्या जवळच्या 'आपले सरकार' सेवा केंद्रावर किंवा सीएससी (CSC) सेंटरवर जाऊन बायोमेट्रिकद्वारे आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी: शेतकऱ्यांनी आपली डिजिटल शेती नोंदणी (Farmer Registry) करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, ७/१२ उतारा आणि बँक खात्याचा तपशील आवश्यक असेल. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages