८० किलो मांसासह १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिरजगाव कसबा,
दिनांक २३,डींगाबर सुने
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शिरजगावकसबा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आझाद चौक परिसरात छापा टाकून गोवंशीय जनावरांच्या कथित कत्तल व मांसविक्री प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे .
कारवाईत ८० किलो मांसासह १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी निसार खाँ गफूर खाँ (वय ६०) व शफिक अहमद छोटे खाँ (वय ४५, दोघे रा. आझाद चौक, शिरजगावकसबा) यांच्या घरात पंचांसमक्ष छापा टाकला. त्यावेळी दोघेही गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान ८० किलो कथित गोवंशीय मांस (किमत १६ हजार रुपये), लोखंडी तराजू, मांस कापण्यासाठीचे सत्र, लाकडी कुने, धार लावण्याचे कानस तसेच वजनाची मापे, असा एकूण १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी ठाणेदार अमन सिरसट यांच्या फिर्यादीवरून शिरजगावकसबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शिरजगावकसबा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आझाद चौक परिसरात छापा टाकून गोवंशीय जनावरांच्या कथित कत्तल व मांसविक्री प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे .
कारवाईत ८० किलो मांसासह १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी निसार खाँ गफूर खाँ (वय ६०) व शफिक अहमद छोटे खाँ (वय ४५, दोघे रा. आझाद चौक, शिरजगावकसबा) यांच्या घरात पंचांसमक्ष छापा टाकला. त्यावेळी दोघेही गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान ८० किलो कथित गोवंशीय मांस (किमत १६ हजार रुपये), लोखंडी तराजू, मांस कापण्यासाठीचे सत्र, लाकडी कुने, धार लावण्याचे कानस तसेच वजनाची मापे, असा एकूण १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी ठाणेदार अमन सिरसट यांच्या फिर्यादीवरून शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ३२५/२०२६, कलम ३(५) भा.न्या.सं. सहकलम ५, ५(ब)(क), ९(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा अधिनियम २०१५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपूर श्री. माधवराव गरुड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमन सिरसट, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक पतिराम बेठे, पोलिस कॉन्स्टेबल दीपक गवई , अमोल नंदरधने व चालक पोलिस कॉन्स्टेबल अजय कुंमरे यांनी केली आहे.