पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 16, 2026

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

 



             अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज , शुक्रवार, दि. 17 जुलै, रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            दौऱ्यानुसार पालकमंत्री श्री. बावनकुळे हे सकाळी 10 वाजता मोटारीने नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.

 दुपारी 4.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीव्दारा मंजूर निधी अंतर्गत पोर्टेबल टॉयलेट व रेनकोट तसेच जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आधुनिक व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 5 वाजता टाईप 4, ऑफीसर क्वार्टर, मालटेकडी येथे पोलीस अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नूतन क्वार्टरचे उद्घाटनास उपस्थिती. सांयकाळी 5.30 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका चौक, गाडगेनगर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 7 वाजता अमरावती येथून मोझरीकडे प्रयाण करतील. तेथे खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोयीनुसार रात्री 8 वाजता मोटारीने अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages