अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा मंगळवारपासून आयोजित करण्यात आल्या आहे. मंगळवार, दि. 28 ते 31 जुलै दरम्यान विविध वयोगटाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा अमरावती येथील जिल्हा परिषद सायन्सकोर मैदान आणि पोलिस ग्राऊंड येथे घेण्यात येणार आहे.
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीच्या वतीने 2026-27 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल कप, सबज्युनियर मुले, ज्युनिअर मुले, मुली क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूकरीता सबज्युनिअर 15 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धेसाठी मुले वयोगटात दि. 1 जानेवारी 2012 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 मुले, मुली वयोगटासाठी दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in/register या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघानी नोंदणी करावी. सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी केली आहे, अशा संघाना स्पर्धा स्थळ व वेळ कळविण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूकडे वय निश्चिती चाचणी, 5 वर्ष वयापर्यंत असताना शासकीय जन्माचा दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, मुळ प्रतीत असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील शाळा, संघानी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी केलेल्या संघाना कार्यालयातर्फे कळविण्यात येणार आहे. संघासोबत जबाबदार शारिरीक शिक्षक, सहायक शिक्षक असणे आवश्यक आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.