मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, July 25, 2026

मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा

 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अमरावती, दि.२५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या आज शनिवार, दि. 25 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्रीमती तटकरे ह्या दि. 25 जुलै रोजी भोकरबर्डी, धुळघाट रोड व कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतील. तसेच स्थानिक आदिवासी महिला बचत गटांच्या महिलांशी चर्चा करतील. दुपारी 1 वाजता धारणी येथील एनआरसी केंद्रास भेट देऊन कामकाजाची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता धारणी शासकीय विश्रामगृहात कुपोषण, बालमृत्यू आणि विविध स्थानिक समस्या व उपाययोजनांबाबत प्रशासकीय बैठक घेतील. तसेच लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिल्यानंतर सायंकाळी त्या परतवाडामार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील. रात्री अमरावती शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.

रविवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता समृद्धी महामार्गाने वाशीमकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages