शिरजगाव कसबा ,डींगाबर सुने दिनांक२
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
२९ जुलैचे रात्री ८ वाजता शिरजगाव कसबा उत्तरेकडील (मौजा पाळा) भागामध्ये अतिवृष्टी झाल्याने मेघा नदी व चारघड नाल्याला पूर आल्याने पांढरी गावातील २ नागरिक वाहून गेलेले होते.
वाहून गेलेल्यांचा शोध घेण्याकरीता अमरावती वरून महसूल प्रशासनाची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम आलेली होती दुसरे दिवशी रवींद्र आवारे यांचा मृतदेह घटनास्थळापासून २ किलोमीटर अंतरावर चारघड नालापात्रात काटेरी झुडपात आढळून आलेला होता दुसरा मृतदेह आढळून न आल्याने २ दिवस शोध सुरूच होता तिसरे दिवशी गोपाल वासुदेव निर्वार यांचा मृतदेह घटनास्थळापासून अंदाजे ६ किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीचे पात्रात पिंपळखुटा गावाजवळ आढळलेला आहे.
मृतदेह फुगलेला असून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे.
0 Comments