अमरावती येथे दोन स्वतंत्र तहसील कार्यालयांचा प्रस्ताव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 26, 2026

अमरावती येथे दोन स्वतंत्र तहसील कार्यालयांचा प्रस्ताव



समाविष्ट गावांच्या यादीवर 15 दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन

अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख आणि गतीमान करण्यासाठी अमरावती येथे प्रस्तावित असलेल्या अपर तहसीलदार कार्यालयाबाबत 15 दिवसांची जाहीर सूचना तयार करून ती सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या रचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. या प्रस्तावानुसार आता अमरावती जिल्ह्यामध्ये 'अपर तहसील कार्यालय (अमरावती ग्रामीण)' आणि 'तहसील कार्यालय, अमरावती (अमरावती शहर)' अशी दोन स्वतंत्र कार्यालये अस्तित्वात येणार असून, यामध्ये समाविष्ट असणारे महसूल मंडळ, ग्राम महसूल अधिकारी यांचे साजे (तलाठी साजे) आणि गावांची सविस्तर यादी या जाहीरनाम्यासोबत संलग्न करण्यात आली आहे. या दोन्ही प्रस्तावित कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या महसूल मंडळांच्या आणि गावांच्या रचनेबाबत ज्या कोणा नागरिकांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या काही हरकती अथवा सूचना असतील, त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपल्या लेखी हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात, तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशी माहिती अमरावतीच्या उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages