नाला बुजविल्याने शेतकरी चिंतेत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 30, 2026

नाला बुजविल्याने शेतकरी चिंतेत

 


पावसाचे पाणी शेतात व रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना त्रास

■  शिरजगाव बंड दिनांक ३० ग्रामीणमध्ये न्यूज नेटवर्क 

(सौ. नीलिमा नितीन टीगंने)

   येथील नैसर्गिक पावसाळी नाला माती टाकून बुजविल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे पावसाचे पाणी शेतात व रस्त्यावर सासल्याने शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना त्रास होत आहे.

शिरजगाव बंड-चांदूरबाजार मार्गालगत असलेल्या या नैसर्गिक नाल्यातून अनेक वर्षांपासून शेतातील तसेच डांबरी रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जात होते. मात्र काही शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने नाल्यात माती टाकून तो बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शिरजगाव बंड ते चांदूरबाजार मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था

 गावकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे.पावसाचे पाणी ज्या शेतकऱ्यांच्या बाधामधून जातं होते त्या शेतकऱ्यानी प्रशासनाला वारंवार सूचना देऊन प्रशासन निष्क्रिय राहिली त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः  बांध बुजवला म्हणुन ही अवस्था निर्माण झाली आहे.

   नाला बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच हे पाणी शेजारील वसाहतीत आणि शिरजगावबंड ते चांदूरबाजार मार्गावर साचल्यास नागरिक व वाहनधारकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया-

 "नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल."

 - योगेश गाडे, तहसीलदार, चांदूरबाजार.

याप्रकरणी शेतकरी व ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात शेती, वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages