विशेष लेख- पेडगांवचे शहाणे """"""""""""""" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 17, 2026

विशेष लेख- पेडगांवचे शहाणे """""""""""""""

पेडगांवचे शहाणे """""""""""


अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव


मराठी भाषेमध्ये पेडगाव चे शहाणे हा वाक्प्रचार हमखास पाहायला मिळतो.....

मूळात हा वाक्प्रचार कसा रूढ झाला ह्याचा मागोवा घेणे वस्तुस्थिती ला धरून होईल.....

अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं एक गाव आहे.... ह्याच गावाला लागून बहादूरगड नावाचा किल्ला होता.....

किल्ल्या औरंगजेबाच्या ताब्यात असल्यामुळे त्याच्या देखरेखी साठी बादशहाने बहादूरशा नावाच्या सुभेदाराला नेमले होते.....

खान पराक्रमी होता पण तेवढाच मग्रूर होता....

लुटालूट करून त्याने अव्वल प्रतिचे २०० घोडे आणि एक कोटी होन संपत्ती किल्ल्यावर जमा केली होती.....

ही सर्व संपत्ती आणि उच्च प्रतीचे घोडे तो बादशहा कडे पाठवणार आहे ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळताच त्यांनी एक योजना आखली.....

किल्ल्यावरील ही सर्व संपत्ती लुटून नेण्यासाठी २००० मराठ्यांची तुकडी हल्ला करणार आहे ही बातमी छत्रपतींनी खानापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था केली.....

छत्रपतींनी आखलेली हल्लाची बातमी कळताच खान घमेंडींने बोलला__

" २००० मराठे....आने दो.

आतेही उनको कुचल देंगें."

आणि खरोखरच २००० मराठ्यांची तुकडी किल्ल्याकडे येतांना खानाला दिसली....

खानाने आदेश देऊन किल्ल्याचे दरवाजे उघडले....

उद्देश एकच मराठे आत येताच त्यांच्यावर किल्लातील ७००० हजार सैनिकांनी प्रतिहल्ला करून त्यांना संपविणे.....

पण मराठे किल्लाचे दरवाजे सताड उघडे असून आत येत नव्हते...उलट ते किल्ल्याच्या बाहेर घुटमळत होते.....

खानाने काहीएक विचार न करता किल्लातील सर्व सैनिकासह  मराठ्यांवर हल्ला करण्याचा आदेश दिला.....

खानाचा प्रतिहल्ला बघून मराठे आल्या वाटेने पळू लागले.....

मराठे पुढे आणि त्यांच्या पाठीमागे खान आणि त्याचे सैनिक.....

असा शिवाशिवाचा खेळ सुरू असतांना मराठे एकाएकी गायब झाले....

आपल्या भीतीने डरपोक मराठे पळून गेले ह्या जाणिवेने खान आनंदाने बेभान झाला....

आपल्या पराक्रमाची वार्ता बादशहाच्या दरबारात पोहोचताच आपली बढती होईल ह्या मनसूब्याने खान माघारी फिरला.....

तो किल्ल्याच्या जवळपास येताच त्याला धक्का बसला....

किल्ला आगीच्या ज्वाळांनी धगधगत होता...

त्याने किल्लेदाराकडे विचारणा केली.....

तेंव्हा किल्लेदार नम्रपणे बोलला_

"हुजूर.... आपल्या आदेशावरून किल्लातील सर्व सैनिकासह आपण सर्व मराठ्यांच्या बिमोडासाठी बाहेर पडलो.... किल्ल्याच्या संरक्षणासाठी कोणीच नसल्यामुळे मराठ्यांनी डाव साधला...."!

आणि एवढ्यातच एक खबर्या किल्ल्यावरून घाबरत खानापुढे येत बोलला_

" हुजूर....गजब हो गया...

मराठोने सब लुट लिया...

घोडे....सारी धनदौलत लेकर वो चले गये.... और किल्ले को आग लगा दी !"

बातमी ऐकून खानाचे होश उडाले.....

आपण ज्यांना चुहें समजत होतो ते शेर निघाले

ह्या जाणिवेने खानाचा अहंकार चक्काचूर झाला

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र 

गनिमी कावा

यासंबंधीची एक घटना 

औचित्य साधून उद्धृत करीत आहे....

👆ह्या संपूर्ण घटनाक्रमात महाराजांच्या एकाहीव मावळ्याला इजा तर सोडा साधे खरचटले सुद्धा नाही.....

पण खानाला मात्र दिवसा आकाशात तारे दिसू लागले

लेखक-

* नानासाहेब देवतळे 

शिरजगाव कसबा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages