शासकीय आय.टी.आय. गुरुकुंज मोझरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, June 17, 2026

शासकीय आय.टी.आय. गुरुकुंज मोझरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 


10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी

अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे सत्र ऑगस्ट 2026 करिता अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता, कौशल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या शैक्षणिक सत्रासाठी संस्थेत एकूण 368 जागा उपलब्ध असून, 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अशा लोकप्रिय कोर्सेसचा यात समावेश आहे.

संस्थेमध्ये 1 वर्षाच्या कोर्सेस अंतर्गत वुड वर्क टेक्नॉलॉजी, कोपा, मेकॅनिक डिझेल, वेल्डर, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आणि सोलर टेक्निशियन हे कोर्सेस उपलब्ध आहेत. तर 2 वर्षांच्या कोर्सेसमध्ये इलेक्ट्रीशियन, वायरमन, मेकॅनिक मोटर व्हेहिकल, मशिनिस्ट, फिटर, आय.सी.टी.एस.एम. आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिक यांसारख्या ट्रेडचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेत सुसज्ज संगणक कक्ष, मोफत इंटरनेट, वाचनालय, वसतिगृह, कॅन्टीन, शुद्ध पिण्याचे पाणी आणि ओपन ग्रीन जिम या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

केवळ सैद्धांतिक शिक्षणच नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी येथे कॅम्पस ड्राईव्ह, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि इंडस्ट्रियल व्हिजिट याद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी मिळवून दिल्या जातात. याशिवाय संस्थेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रभावीपणे राबविली जात आहे तरी इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आय.टी.आय. मोझरी येथे थेट किंवा 07225-224237 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages