निरोगी वृद्धत्वासाठी योग; २१ जूनला अमरावतीकर एकत्र येऊन साजरा करणार योग दिन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, June 15, 2026

निरोगी वृद्धत्वासाठी योग; २१ जूनला अमरावतीकर एकत्र येऊन साजरा करणार योग दिन



 

अमरावती, दि १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जाणार आहे. यंदाच्या योग दिनासाठी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही थीम आणि ‘योग करा निरोगी रहा आणि आनंदी आयुष्य जगा’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. या वर्षीचा मुख्य जिल्हास्तरीय कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ योग प्रसारक उपस्थित राहणार आहेत.

 

हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, एस.आर.पी.एफ., महानगरपालिका, शिक्षण विभाग, वनविभाग, जिल्हा होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि क्रीडा भारती यांसह जिल्ह्यातील विविध योग व क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

 

जिल्ह्यातील सर्व नागरिक, क्रीडाप्रेमी, योग समिती सदस्य, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांना २१ जून रोजी सकाळी ६.१५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाला येताना नागरिकांनी सोबत स्वतःची पाण्याची बॉटल आणि चटई किंवा मॅट्स आणावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

****

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages