बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवता येते? जाणून घ्या आरबीआयचा नियम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, June 18, 2026

बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवता येते? जाणून घ्या आरबीआयचा नियम


दि.१८ :-

घरातील मौल्यवान दागिने आणि सोन्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बहुतांश नागरिक बँक लॉकरचा (Bank Locker) पर्याय निवडतात. मात्र बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवता येते आणि काही नुकसान झाल्यास बँक किती भरपाई देते, याबाबत अनेकांना माहिती नसते. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार लॉकरमध्ये सोने ठेवण्यावर निश्चित मर्यादा नाही.

सोने ठेवण्यावर आरबीआयची कोणतीही मर्यादा नाही 

ग्राहक आपल्या गरजेनुसार सोने, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे लॉकरमध्ये ठेवू शकतात. मात्र या वस्तू कायदेशीर मार्गाने खरेदी केल्याचे पुरावे जपून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात गरज पडल्यास हे कागदपत्र उपयोगी ठरू शकतात.

... तर शंभरपट भरपाई

वस्तूंची चोरी, दरोडा, आग किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभरपट रकमेपर्यंतच भरपाई देऊ शकते.

लॉकरचे वार्षिक भाडे २,००० रुपये असल्यास कमाल भरपाई २ लाख रुपये मिळू शकते. त्यामुळे लॉकरमध्ये मोठ्या मूल्याचे सोने ठेवणाऱ्यांनी या नियमांची माहिती ठेवणे आवश्यक आहे.

लॉकरच्या भाड्याच्या १०० पट नियमामुळे, लॉकरमध्ये मर्यादित मूल्याचेच सोने ठेवावे.

लॉकरमध्ये खूप जास्त प्रमाणात सोने असल्यास, नामांकित विमा कंपन्यांकडून 'बँक लॉकर इन्शुरन्स' पॉलिसी घ्यावी.

 आरबीआयच्या नियमांनुसार, ग्राहकाने वर्षभरात किमान एकदातरी आपले लॉकर उघडून ऑपरेट करणे आवश्यक आहे, अन्यथा बँक ते लॉकर सील करू शकते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages