दहावी-बारावी पुरवणीपरीक्षार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन व हेल्पलाईनसेवा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 19, 2026

दहावी-बारावी पुरवणीपरीक्षार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन व हेल्पलाईनसेवा

  


अमरावती, दि. २०:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. परिक्षा काळातील भिती व तणाव दूर करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मंडळाच्या हेल्पलाईन व समुपदेशकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

          मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी जाहीर केलेल्या प्रकटनानुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता १० वीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जून २०२६ आणि १२ वीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पार पडेल. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी मंडळाने ७२०८४२९३८१, ९४०४७८३९९६ आणि ९९६०६४४४११ हे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

          याशिवाय, यंदाच्या परीक्षेपासून मंडळाने 'मुक्तांगण मित्र' या संस्थेमार्फत विद्यार्थी, पालक व इतर घटकांसाठी ९११२७०९११२ या क्रमांकाद्वारे विशेष समुपदेशन सेवा सुरू केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी टेलीमानस हेल्पलाईन क्रमांक १४४१६ आणि मनोदर्शन हेल्पलाईन क्रमांक ८४४८४४०६३२ देखील उपलब्ध राहतील.

          राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत एकूण ३१५ समुपदेशकांची सेवा पुरवण्यात आली असून, त्यांचे मोबाईल नंबर आणि पत्ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages