केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रविवारी दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 28, 2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रविवारी दौरा




अमरावती, दि. २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा रविवार, दि. 31 मे रोजी जिल्हा दौरा आहे.

दौऱ्यानुसार, श्री. गडकरी दि. 31 मे रोजी दुपारी 1 वाजता अरुण अडसड यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता 'अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भेट, दुपारी २ वाजता महेंद्र राहटगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सायंकाळी 5.30 वाजता 'द लाली इम्पेरियल'च्या कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. सायंकाळी 6 वाजता शारीरिक शिक्षण महाविद्यालयात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री 8.15 वाजता अमरावतीहून नागपूरकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages