शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी *जिल्हा प्रशासनाचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, May 28, 2026

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी *जिल्हा प्रशासनाचे आवाहन



            अमरावती, दि.२९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : किसान सन्मान निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना येत्या कालावधीत मिळणार आहे. हा लाभ शेतकऱ्यांना तातडीने मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आपला गाव नमुना, सातबारा उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून 'फार्मर आयडी' प्राप्त करून घ्यावा.

जिल्ह्यात अचलपूर 7 हजार 721, अमरावती 14 हजार 479, अंजनगाव सुर्जी 5 हजार 411, भातकुली 7 हजार 208, चांदूर रेल्वे 4 हजार 164, चांदूरबाजार 8 हजार 334, चिखलदरा 1 हजार 559, दर्यापूर 9 हजार 408, धामणगाव रेल्वे 5 हजार 821, मोर्शी 9 हजार 176, नांदगाव खंडेश्वर 8 हजार 893, तिवसा 6 हजार 472, वरूड 8 हजार 749 खातेदार ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यापासून शिल्लक आहेत. मात्र धारणी तालुक्यात अधिकचे 731 खातेदार नोंदणी झाली आहे.

जिल्ह्यात एकूण 5 लाख 16 हजार 195 खातेदार असून आतापर्यंत 4 लाख 22 हजार 649 खातेदारांची नोंदणी झाली आहे. अद्यापही 93 हजार 546 खातेदारांची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages