स्थान: भिलखेडा गाव, चिखलदरा तहसील, मेळघाट (अमरावती जिल्हा).
चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा गावात हा निसर्गरम्य नजरा पाहायला मिळत आहे.
मेळघाटच्या उंच डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी आपल्या शेतीची मशागत पूर्ण केली आहे.
भिलखेडा गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी ते प्रामुख्याने मक्याचे पीक घेणार आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर डोंगराळ शेतांमध्ये झालेली ही तयारी चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडत आहे.
तांबडी माती आणि डोंगररांगांमुळे हा संपूर्ण परिसर सध्या एक सुंदर नैसर्गिक पर्यटन केंद्र बनला आहे.