"राष्ट्रहितासाठी एक पाऊल: सोने खरेदीपासून इंधन बचतीपर्यंत, मोदींचे ८ 'मास्टर प्लॅन'"
दि. १२:- पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक तेल संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर येणारा दबाव लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ८ मोठे संकल्प करण्याचे आवाहन केले आहे . रविवारी, १० मे २०२६ रोजी तेलंगणातील एका सभेत बोलताना त्यांनी हे महत्वपूर्ण मुद्दे मांडले .
खालीलप्रमाणे पंतप्रधान मोदींनी देशहितासाठी ८ आवाहने केली आहेत:
सोने खरेदी टाळा: परकीय चलनाची बचत करण्यासाठी लग्नसराई असली तरी किमान एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
इंधनाचा मर्यादित वापर: पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत गरजेनुसारच करावा
'वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य: शक्य असेल तिथे घरून काम (WFH) करा आणि ऑनलाइन मीटिंग्सचा वापर वाढवा
परदेशी सहली टाळा: अनावश्यक परदेश प्रवास आणि सुट्ट्या टाळून देशाचे परकीय चलन वाचवण्यास मदत करा
सार्वजनिक वाहतुकीचा वापर: खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, बस, रेल्वे आणि कारपूलिंगचा जास्तीत जास्त वापर करा
इलेक्ट्रिक वाहने (EV): पर्यावरणासाठी आणि इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन द्या
जबाबदार नागरिक बना: छोटे-छोटे संकल्प घेऊन देशहितासाठी योगदान द्या; देशभक्ती केवळ सीमेवरच नाही तर जबाबदार नागरिक म्हणूनही दाखवता येते
हे केवळ आवाहन आहे: पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, हा केवळ सल्ला असून सध्या कोणतेही कायदेशीर निर्बंध किंवा अधिकृत बंदी घालण्यात आलेली नाही
पंतप्रधानांनी नमूद केले की, कठीण काळात प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असते आणि हे "प्रथम राष्ट्र" (Nation First) या भावनेने केलेले आवाहन आहे . दरम्यान, सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही