Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावती जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर;



25.81 लक्ष मतदारांच्या नोंदींची होणार घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी

अमरावती, दि१६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या व्यापक मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील सुमारे 25 लक्ष 81 हजार 722 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाशी सांगड घालून क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.

या मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत व्यापक स्वरूपात केली जाणार असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपशिलाची खातरजमा केली जाईल. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स' (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या मतदार मॅपिंगच्या सद्यस्थितीचा विचार करता, 36-धामणगाव रेल्वे मतदारसंघात 3 लक्ष 13 हजार 425 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 91 हजार 784 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 21 हजार 641 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, ज्याची टक्केवारी 93.1 इतकी आहे. 37-बडनेरा मतदारसंघात 3 लक्ष 78 हजार 292 एकूण मतदारांपैकी 3 लक्ष 1 हजार 517 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 76 हजार 775 अपूर्ण असून टक्केवारी 79.7 आहे. 38-अमरावती मतदारसंघात 3 लक्ष 83 हजार 471 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 82 हजार 437 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 1 लक्ष 1 हजार 34 अपूर्ण असून टक्केवारी 73.65 आहे. 39-तिवसा मतदारसंघात 2 लक्ष 99 हजार 14 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 62 हजार 29 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 36 हजार 985 अपूर्ण असून टक्केवारी 87.63 आहे. 40-दर्यापूर मतदारसंघात 3 लक्ष 7 हजार 851 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 90 हजार 372 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 17 हजार 479 अपूर्ण असून टक्केवारी 94.32 आहे. 41-मेळघाट मतदारसंघात 3 लक्ष 11 हजार 478 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 74 हजार 581 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 36 हजार 897 अपूर्ण असून टक्केवारी 88.15 आहे. 42-अचलपूर मतदारसंघात 2 लक्ष 95 हजार 836 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 48 हजार 218 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 47 हजार 618 अपूर्ण असून टक्केवारी 83.9 आहे. तर 43-मोर्शी मतदारसंघात 2 लक्ष 92 हजार 355 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 60 हजार 375 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 31 हजार 980 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे आणि येथील टक्केवारी 89.06 आहे. अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात एकूण 25 लक्ष 81 हजार 722 मतदारांपैकी 22 लक्ष 11 हजार 313 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 3 लक्ष 70 हजार 409 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, ज्याची एकूण सरासरी टक्केवारी 85.65 इतकी आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निवडणूक यंत्रणा व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता, 36-धामणगाव रेल्वे मतदारसंघात 378 एकूण मतदान केंद्रे, 38 पर्यवेक्षक आणि 378 बीएलओ कार्यरत आहेत. 37-बडनेरा मतदारसंघात 345 मतदान केंद्रे, 29 पर्यवेक्षक आणि 345 बीएलओ आहेत. 38-अमरावती मतदारसंघात 322 मतदान केंद्रे, 31 पर्यवेक्षक आणि 322 बीएलओ आहेत. 39-तिवसा मतदारसंघात 319 मतदान केंद्रे, 33 पर्यवेक्षक आणि 319 बीएलओ आहेत. 40-दर्यापूर मतदारसंघात 342 मतदान केंद्रे, 20 पर्यवेक्षक आणि 342 बीएलओ आहेत. 41-मेळघाट मतदारसंघात 356 मतदान केंद्रे, 23 पर्यवेक्षक आणि 356 बीएलओ आहेत. 42-अचलपूर मतदारसंघात 309 मतदान केंद्रे, 25 पर्यवेक्षक आणि 309 बीएलओ आहेत. तर 43-मोर्शी मतदारसंघात 311 मतदान केंद्रे, 26 पर्यवेक्षक आणि 311 बीएलओ कार्यरत आहेत. संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा विचार करता एकूण 2 हजार 682 मतदान केंद्रे, 225 पर्यवेक्षकांची पदे आणि 2 हजार 682 बीएलओ या प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने या मोहिमेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार दिनांक 20 ते 29 जून 2026 या कालावधीत सर्व बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करून दिली जाईल. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत निवडणूक यंत्रणा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेईल. या पडताळणीनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांना 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत आपल्या दावे व हरकती नोंदवता येतील. सर्व दावे व हरकतींचा निपटारा केल्यानंतर शेवटी 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

माहितीची अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले अधिकृत एजंट (BLA) नियुक्त करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments