स्वाधार योजनेतील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मेपर्यंत संधी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 15, 2026

स्वाधार योजनेतील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मेपर्यंत संधी


अमरावती, दि.१६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत (सन 2025-26) मधील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीअभावी परत करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दि. 15 मे ते 30 मे 2026 या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणे अनिवार्य आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास इयत्ता अकरावी, बारावी आणि पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी स्वाधार योजनेंतर्गत थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा हार्डकॉपी सादर केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना पोर्टलवर संदेश, मोबाईल आणि ई-मेलद्वारे त्रुटींबाबत कळवण्यात आले आहे.

अर्जातील त्रृटी दूर करण्यासाठी दि. 15 ते 30 मे दरम्यान दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, अमरावती येथे उपस्थित राहावे लागणार आहे. विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता केलेली नसल्यास विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाच्या (2025-26) लाभापासून कायमचा वंचित राहील. अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षातही या योजनेसाठी नवीन अर्ज करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित hmas.mahait.org संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करावीत, अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages