‘नीट’ परीक्षेमुळे ‘टीईटी’च्या तारखेत बदल; आता 28 जून रोजी होणार परीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 15, 2026

‘नीट’ परीक्षेमुळे ‘टीईटी’च्या तारखेत बदल; आता 28 जून रोजी होणार परीक्षा


 दिनांक: १६ मे २०२६

 


Ø परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध

 

          अमरावती दि.१६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, 21 जून  रोजी आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) - 2026’ आता 28 जून  रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) याच दिवशी देशभरात 'नीट' परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही परीक्षांसाठी अनेक केंद्रे सामायिक आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पडावी आणि परीक्षार्थींची गैरसोय टाळावी, या उद्देशाने परिषदेने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

          सुधारित वेळापत्रकानुसार, 28 जून रोजी टीईटी परिक्षेचा, पेपर 1 सकाळी 10:30 ते दुपारी 1:00 या वेळेत, तर पेपर 2 दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत पार पडेल. उमेदवारांना 16 जून ते 28 जून 2026 या कालावधीत परिषदेच्या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे ऑनलाईन डाऊनलोड करता येतील. प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल झाल्यास त्याची माहिती https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages