शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड: - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 19, 2026

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड:

 



4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त; एक आरोपी ताब्यात

 

मुंबई, दि. २० : शिधावाटप भरारी पथकाने मोठी कारवाई करत ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड  टाकून 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

 

            धाडीदरम्यान स्टोअरच्या तळघरात विविध तेल कंपन्यांचे सिलेंडर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले आढळले. यामध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आणि गो गॅस कंपनीचे एकूण 140 सिलेंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी 55 सिलेंडर भरलेले तर 85 सिलेंडर रिकामे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

जप्त करण्यात आलेल्या सिलेंडरची एकूण किंमत 4 लाख 59 हजार 400 रुपये इतकी असून हा संपूर्ण मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. ही कारवाई अवैध साठा व नियमबाह्य वापराच्या संशयावरून करण्यात आली. या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला चितळसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

 

 नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, चर्चगेट यांच्या आदेशानुसार तसेच उपनियंत्रक शिधावाटप ‘फ’ परिमंडळ, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आलेल्या या कारवाईत भरारी पथकातील अधिकारी, शिधावाटप कार्यालय क्र. 41 ‘फ’ ठाणे येथील कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी सहभागी होते. व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर आणि बेकायदेशीर साठा रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages