बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे -जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 26, 2026

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे -जिल्हाधिकारी आशिष येरेकर





*उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा गौरव

अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : गाव पातळीवर उद्योग उभारताना आवश्यक असलेला पतपुरवठा बँकांनी करावा. यामुळे गावातही चांगले प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास मदत मिळेल. त्यामुळे बँकांनी कर्जवाटप करताना उद्योगाप्रती सकारात्मक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये कर्ज मंजूरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी बँकांची निर्मिती ही छोट्या उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी झाली आहे. हा पतपुरवठा हा सामान्य नागरिकांनी बचतीच्या स्वरूपात गोळा केलेल्या पैशातून केला जातो. मोठ्या उद्योगाप्रती बँकांचे धोरण सकारात्मक असताना छोट्या उद्योगांनाही पतपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावातील प्रक्रिया उद्योगांना पतपुरवठा झाल्यास ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल. गेल्या वर्षी जिल्ह्याने प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शासन सहाय्य करणाऱ्या योजनांची एक हजाराहून प्रकरणे बँकांकडे सादर केली आहे. यात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी बँकांनी उद्योगांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेल्या बँक व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. यात बँक ऑफ बडोदाचे प्रशांत गावंडे, लोहिता के.एस., जयदीप राठोड, बँक ऑफ इंडियाचे रणजीत ठाकरे, घनश्याम ढवळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल शेंडे, प्रशांत चरडे, रुपेश नंदनवार, प्रफुल रसाळपायले, शिवशंकर फड, आलोक कोठेकर, मृणाल क्रांती राणा, कॅनरा बँकेच्या योगिता देशमुख, संदीप तेटे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अजित लिंगाटे, महेंद्र येलमे, नवनीत उमाळे, अमर दाभर्डे, संदीप सूर्यवंशी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुदीप्ता घोष, जयंत मोरे, पंकज समर्थ, कमर सगीर, रिचा निमोणकर, मधुकर तळपदे, अभिनव राऊत, निधी अग्रवाल, युनियन बँक ऑफ इंडियाचे अक्षय सोनोने, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक नवीनकुमार उप्पलवार, मुख्य व्यवस्थापक रविकुमार दालु, ललित त्रिपाठी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, प्रोसेसिंग हेड प्रवीण जंगम, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एलडीएम नरेश हेडाऊ, प्रादेशिक व्यवस्थापक सुनील पांडे, कॅनरा बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक रामबाबू मीना, बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजेश कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक अमोल मोरे यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages