मा. रजीयाताई सुलताना यांचे गाडगेबाबा यांचे किरातानातील समाजचिंतन या पुस्तकांचे प्रकाशन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 26, 2026

मा. रजीयाताई सुलताना यांचे गाडगेबाबा यांचे किरातानातील समाजचिंतन या पुस्तकांचे प्रकाशन


 पुणे दि. २७ :-

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रजिया सुलताना यांच्या गाडगेबाबाच्या किर्तनातील समाजचिंतन या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुणे येथे एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे झालेले आहे.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे डॉ. सदानंद मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक मा. अशोकजी धिवरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, उत्तराखंड महिला आयोगाच्या उपाध्यक्षा शायरा बानो, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमोसुद्दीन तांबोळी आणि हैदराबादचे प्रसिध्द कथा लेखक शेख युसुफ हजर होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रशियन भाषातज्ञ ईशाद वडगावकर यांनी केले, आभार प्रदर्शन दिलावर शेख यांनी केलेले आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लेखक उपस्थित होते. रजिया सुलताना ह्यांचे सामाजिक आशयाचे हे चाळीसावे पुस्तक आहे.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages