Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

 



अमरावती, दि. ०७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार दि. 8 एप्रिल आणि गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती आगमन व कार्यालयीन कामकाज. दुपारी 3 वाजता विश्रामगृह, अचलपूर येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडीसंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 4 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सायंकाळी 7 वाजता चिखलदरा विश्रामगृह मुक्काम.

गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता धारणी विश्रामगृह येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत बैठक व चर्चा, तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांचे समवेत आदिवासी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत बैठक व चर्चा करतील. दुपारी 1.30 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट देतील.


Post a Comment

0 Comments