अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला जिल्ह्य विशेष बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, March 8, 2026

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला जिल्ह्य विशेष बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर


अकोट दिनांक८

ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ( कु. प्रियंका केदार)

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची वारी हनुमान मंदिरात विशेष बैठक पार पडली काल, शनिवार ७ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या विस्तार आणि बळकटीकरणासाठी विविध जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या.

या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल कवडकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले यांची विशेष उपस्थिती होती. तसेच, पश्चिम विदर्भ कार्याध्यक्ष (महिला आघाडी) प्रियंका केदार यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले.

​संघटनेचे कार्य तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलप्रमाणे नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली:

​नंदकिशोर नागपुरे: अकोला जिल्हा उपाध्यक्ष, देवकीनंदन मथारिया सर पदवीधर जिल्हा अध्यक्ष,

​राजपाल दामोदर: जिल्हा उपाध्यक्ष (डिजिटल मीडिया)

​अर्जुन खिरोडकार: तेल्हारा तालुका अध्यक्ष

​अ. शरीफ अ. शाहिद: जिल्हा सचिव

​कुलदीप चौरे: अकोट सहसचिव

​पत्रकारांच्या हितासाठी कटीबद्ध

​यावेळी मार्गदर्शन करताना पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने सदैव तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अनिल कवडकार सर यांनी पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपण्यावर आणि संघटनेच्या एकतेवर भर दिला.

​या निवडीबद्दल जिल्हयातील पत्रकार वर्तुळातून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages