प्रलंबित टपाल तक्रारींसाठी 'डाक अदालत'चे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, March 8, 2026

प्रलंबित टपाल तक्रारींसाठी 'डाक अदालत'चे आयोजन


अमरावती, दि. ०८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी काल , शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 'डाक अदालत' आयोजित करण्यात आले होते . टपाल सेवा हा जनजीवनाचा अविभाज्य भाग असून, सेवा पुरवताना येणाऱ्या त्रुटी किंवा संवादाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करणे हा या अदालतीचा मुख्य उद्देश होता.

या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या गेल्या. विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल येथे घेतली गेली आहे. .

तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. हे अर्ज 'प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती - 444602' यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज 7 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे; त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.



--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages