Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

९ मार्च रोजी, विभागीय महिला लोकशाही दिन


          अमरावती, दि. ८: विभागीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी, ९ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता आयेजित करण्यात आला आहे, असे विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास, अमरावती विभाग) अब्दुल चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

           महिाला व बाल विकास विभागाच्या दि. ४ मार्च २०१३ च्या शासन निर्णया नुसार समस्याग्रस्त पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्याकरीता व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी / अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवून समाजातील समस्याग्रस्त / पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणुन महिला लोकशाही दिन प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तरावर, तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय व दर महिण्याच्या चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर तहसिल कार्यालय या ठिकाणी घेण्यात येते.

          त्यानुसार येत्या सोमवारी, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या विभागीय महिला लोकशाही दिनाचा समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे.

 



Post a Comment

0 Comments