नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 30, 2026

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला



 

अमरावती, दि. ३० : श्रीमती नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. श्वेता सिंघल यांच्याकडून आज स्विकारला. श्रीमती गुंडे ह्या यापूर्वी महिला व बालविकास आयुक्त म्हणून महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथे कार्यरत होत्या. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत.

यावेळी उपस्थित अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विभागीय आयुक्तालयाचे अपर आयुक्त सुरज वाघमारे, अजय लहाने यांनी श्रीमती गुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages