अमरावती, दि. २८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज शनिवार दि. 28 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांचा जीवन गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी येथे पोलीस पाटील परिषद व अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता बसस्टॅंड ते रेल्वे स्टेशन रोड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण आणि ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे भेट देतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता सध्दम्म बुध्द विहार, मार्डी रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्राचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. सोयीने सायंकाळी 5 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
Post a Comment
0 Comments