अमरावतीत ऑक्टोबरमध्ये भव्य पुस्तक महोत्सव घेणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, March 30, 2026

अमरावतीत ऑक्टोबरमध्ये भव्य पुस्तक महोत्सव घेणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे


*जिल्हा ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण





*गाव तिथे ग्रंथालय उभारणार

*स्पर्धा परीक्षेसाठी ई लायब्ररी उपक्रम

अमरावती, दि. ३०(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा भव्य पुस्तक महोत्सव अमरावतीत येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात येईल. या ठिकाणी पश्चिम विदर्भातील सर्व नागरिक येतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच येथे आलेल्या नागरिकांनी एक तरी पुस्तक विकत घ्यावे, यासाठी दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, मनुष्याच्या जीवनात पुस्तकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होऊन अनेक क्रांती घडल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यासाठी गावात असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून येथे वाचनालय सुरू करण्यात येतील. यामुळे प्रत्येक गावात वाचनाची चळवळ उभी राहण्यास मदत होईल.

नव्याने निर्माण झालेली जिल्हा ग्रंथालयाची इमारतीमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवतील. त्यासोबतच ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करून या ठिकाणी डिजिटल लायब्ररी निर्माण करण्यात येतील. प्रामुख्याने या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या डिजिटल लायब्ररीचा उपयोग होईल. यासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर घेण्यात येतील. यासोबतच मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

सुरुवातीला श्री बावनकुळे यांनी जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. श्री. मडावी यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages