24 मार्चला विभागीय हातमाग कापड स्पर्धा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, March 11, 2026

24 मार्चला विभागीय हातमाग कापड स्पर्धा


वस्त्रोद्योग, प्रादेशिक उपआयुक्त कार्यालय, नागपूर येथे राहणार स्पर्धेचे ठिकाण

 

          अमरावती, दि. ११: हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमून्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन २४ मार्च रोजी नागपूर येथे करण्यात आले आहे. अमरावती व नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील हातमाग विणकरांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त, (वस्त्रोद्योग) अंजू बालपांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

          या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हातमाग विणकरांनी तयार केलेले कापड नमूने दि. २० मार्च २०२६ रोजी सायं ५ वाजेपर्यंत प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

          यानुसार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली या हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० ला प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, ‘बी’ विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होणार आहे. विदर्भातील सर्व हातमाग कापड विणकरांनी याची नोंद घ्यावी.

          अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाशी ०७१२-२५३७९२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages