सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम




अमरावती, दि. ०५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जागतिक कर्करोग दिनानिमित्त सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश कर्करोगाविषयी जनजागृती करणे तसेच लवकर निदान व योग्य उपचारांचे महत्त्व रुग्ण व वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.

 

या कार्यक्रमात प्रसिद्ध कैंसर सर्जन डॉ. अतुल यादगिरे,  डॉ. रोहित मुंदडा , डॉ. माधुरी गाडेकर तसेच ऑन्को गायनॅकोलॉजिस्ट डॉ. भावना सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कर्करोगाचे प्रकार, त्याची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना आणि आधुनिक उपचारपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. अतुल यादगिरे यांनी कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे नमूद केले. डॉ. रोहित मुंदडा यांनी बदलती जीवनशैली, तंबाखूचे सेवन व चुकीच्या आहारामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे सांगितले. डॉ. माधुरी गाडेकर यांनी रक्तामधील कर्करोगांविषयी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. तर डॉ. भावना सोनटक्के यांनी महिलांनी नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ आदित्य भागवत यांनी कीमोथेरेपी बद्दल मार्गदर्शन केले.

सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोग शस्त्रक्रिया मोफत होतात याबद्दल देखील माहिती देण्यात आली .

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला उपस्थित डॉ आयुष हेडा , डॉ रणजित मांढवे, डॉ भूषण मुंदडा, डॉ अमित बागडिया, डॉ तृप्ती जवादे, डॉ सत्यम सत्यार्थ, डॉ मनीष नाथणकर, डॉ तेजश्री कीनखेडे, डॉ अलकेश गुल्हाने, डॉ किरण परिसे, डॉ ऐश्वर्या , डॉ अभिनव, डॉ स्नेहल चव्हाण, डॉ सपना गुप्ता, नर्सिंग स्टाफ मंगल मगरदे, ज्योती काळे, कविता बेरड, शालू केवाळे, नंदा टेटु, एनसीडी विभागातील दिनेश हिवराळे यांनी मार्गदर्शन केले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages