अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, अल्पेश हाते आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.