निलेश बदुकले हत्याकांड: मुख्य आरोपी अजयसह गोलू आणि पवनला अटक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, January 21, 2026

निलेश बदुकले हत्याकांड: मुख्य आरोपी अजयसह गोलू आणि पवनला अटक


पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई: निलेश बदुकले हत्याकांडात 'रेकी'चा नवा ट्विस्ट, तिघांना अटक

 चांदूरबाजार  दि. 22 जानेवारी २०२६ :-(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

मृतक: निलेश बदुकले, एक नामांकित गौण खनिज व्यावसायिक

मुख्य आरोपी: अजय लंगोटे

अटक केलेले इतर आरोपी: संजय उर्फ गोलू भुजंगराव लंगोटे (अजयचा भाऊ) आणि पवन विकास झटाले 

घटनेचा वृत्तांत

सोमवारी सकाळी निलेश बदुकले हे त्यांच्या पत्नीसह मॉर्निग वॉक करत असताना, आरोपी अजय लंगोटेने अपघाताचा कट रचून मालवाहू १२ चाकी वाहनाने त्यांना मागून धडक देऊन हत्या केली होती. या भीषण घटनेत निलेश बदुकले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. हे हत्याकांड मुरूम तस्करीच्या कारणावरून घडल्याचे समोर आले आहे.

पोलिस तपास आणि नवीन ट्विस्ट

 चांदूर बाजार पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत मुख्य आरोपी अजयसह गोलू लंगोटे आणि पवन झटाले या दोन आरोपींना अटक केली.

  • नवा ट्विस्ट: गोलू आणि पवन यांनी हत्येच्या दिवशी निलेश बदुकले यांची रेकी केली आणि मुख्य आरोपी अजयला माहिती पुरवल्याचे बोलले जात आहे.
  • गोलू आणि पवन यांनी हत्येपूर्वी तब्बल दोन दिवस निलेश बदुकले यांची हालचाल, वेळापत्रक व मार्गाची रेकी केल्याची कबुली दिली. त्यामुळे ही हत्या नियोजनबद्ध कट रचून केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजय लंगोटेला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, ५ दिवसांच्या मागणीवरून मुख्य आरोपी अजय लंगोटेला न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  • आयपीएस परिवेक्षाधीन अधिकारी सागर भामरे आणि आयपीएस उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार हे तपासावर लक्ष ठेवून आहेत. तसेच पोलिस निरीक्षक अशोक जाधव व सहायक पोलिस निरीक्षक उल्हास राठोड हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जनतेच्या प्रतिक्रिया आणि मागणी
या हत्याकांडामुळे संपूर्ण चांदूर बाजार तालुका हादरून गेला होता. तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि नागरिकांनी समाज माध्यमातून या घटनेचा निषेध केला. गावकऱ्यांनी स्वतःची प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
आरोपी अजय आणि गोलू गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गौण खनिज तस्करी करत असून, महसूल अधिकाऱ्यांच्या आर्थिक मिळवणुकीमुळे त्यांना अभय मिळत असल्याची चर्चा आहे. दोषी अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages