सोमठाणा खुर्द येथील पुनर्वसित ग्रामस्थांना घरमूल्यांकनाचा मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 29, 2026

सोमठाणा खुर्द येथील पुनर्वसित ग्रामस्थांना घरमूल्यांकनाचा मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

 



अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत 2013-14 मध्ये पुनर्वसन झालेल्या आकोट वन्यजीव विभागातील मौजे सोमठाणा खुर्द येथील 112 घरमूल्यांकन धारकांना नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना घरमूल्यांकनाची दोन पट रक्कम देय असून, आवश्यक निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आकोट वन्यजीव विभाग,  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी दिली आहे.

मोबदला मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्रे आकोट वन्यजीव विभाग कार्यालयात सादर करावीत. यामध्ये 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, सुरू असलेल्या बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, आधारकार्डची छायाप्रत, नमुना 8 ची छायाप्रत (मूळ लाभार्थी मृत असल्यास वारस प्रमाणपत्र व वारसांच्या बँक खात्याची प्रत)  ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थ्यांची सविस्तर यादी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सोमठाणा खुर्द येथील लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000000

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages