जिल्हा परिषद प्राथ.मराठी मुलांची शाळा, शिरसगाव कसबा येथे विविध कार्यक्रम संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 29, 2026

जिल्हा परिषद प्राथ.मराठी मुलांची शाळा, शिरसगाव कसबा येथे विविध कार्यक्रम संपन्न


 




विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव

शिरसगाव कसबा दिनांक ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

 भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा शिरसगाव कसबा येथे  रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी नाटक,नृत्यप्रकार, फिल्मीडान्स विविध प्रकारच्या कला, वेशभूषा करून सादर केली आहे .या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना वाव मिळाला आहे .या कार्यक्रमातून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. 

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा कार्यक्रम पहावयास मिळाला, असे पालकांकडून बोलल्या जात आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रवीण  खेरडे सरपंच, उद्घघाटक महेंद्र गवई  ठाणेदार पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा तसेच श्रीकृष्ण आवारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,  शशांक वाठ,  प्रमोद कुऱ्हाडे, केंद्रप्रमुख, सतीश सुरडकर मुख्याध्यापक राठी विद्यालय,  गावंडे शिक्षक तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, कु.मायाताई ठाकूर मुख्याध्यापिका व शाळेतील सर्व शिक्षक व कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन  जयेश दाभाडे व सुनीता शर्मा यांनी केले. तर आभार प्रदर्शन  किशोर याऊल यांनी केले आहे.

पालकांकडून कौतुकाचा वर्षाव
जिल्हा परिषदेच्या शाळेत इतक्या उत्कृष्ट दर्जाचा आणि नेटका कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले. "खाजगी शाळांच्या तोडीस तोड सादरीकरण आमच्या मुलांनी केले," अशा भावना पालकांनी यावेळी बोलून दाखवल्या. कार्यक्रमाला पालकांची आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages