चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेत महारक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 29, 2026

चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेत महारक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर


 




वनरक्षकांनी रक्तदानातून दिला राष्ट्रसेवेचा संदेश
  वन प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

दि. ३० चिखलदरा (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थेमध्ये महारक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी पार पडले. वनरक्षकांनी रक्तदानातून राष्ट्रसेवेचा संदेश दिला. या सामाजिक उपक्रमात वन विभागाच्या प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला. या शिबिरात अमिक्षित वनरक्षक तुकडी क्रमांक ६३, लिपिक व लेखापाल पायाभूत प्रशिक्षणार्थी, तसेच संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संचालिका कु. मुक्ताबाई टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी कवायत शिक्षक सुधीर भाऊराव आकेवार यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कु. शिल्पा घाटे (वनरक्षक), नितीन बघाय, महादेव धुळे यांच्यासह संपूर्ण कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले. ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा येथील वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय चमूने रक्तसंकलन व आरोग्य तपासणीसाठी तांत्रिक व वैद्यकीय सहकार्य पुरवले. त्यांच्या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना चिखलदरा वन प्रशिक्षण संस्थेत संचालिका कु. मुक्ताबाई टेकाळे म्हणाल्या की, “प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. वनरक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. आजचे रक्तदान अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोलाचे ठरेल.” या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages