जिल्हाधिकारी कार्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 29, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

 




            अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून, काल  जिल्हाधिकारी कार्यालयात शोकसभा आयोजित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अजितदादा पवार हे शिस्तीप्रिय होते. त्यांचा वक्तशिरपणा सर्वांच्या परिचयाचा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळून मृतात्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी तातडीने निर्णय घेतला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील आणि प्रशासनातील एक मार्गदर्शक हरपला असल्याचे सांगितले.

             शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या राजकीय दुखवट्यामुळे कार्यालयातील सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages