कौशल्य विकास विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 8, 2025

कौशल्य विकास विभागाची नि:शुल्क अभ्यासिका सुरू





अमरावती, दि. ९ : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करियर सेंटरच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय अभ्यासिका आणि ग्रंथालय विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ही अभ्यासिका पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध आहे.

सदर अभ्यासिका पूर्णपणे वातानुकूलीत असून विद्यार्थ्याना अभ्यासासाठी शांत व सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रंथालयामध्ये उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची पुस्तके, मासिके आणि नामांकित वर्तमानपत्रे विनामुल्य वाचनासाठी उपलब्ध आहेत. यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, रेल्वे, पोलीस भरती, बॅंकींग, तसेच महाविद्यालयीन अभ्यास करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका अत्यंत लाभदायी ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

            अभ्यासिका ही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र तथा मॉडेल करियर सेंटर, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मशिदीजवळ, बस स्टॅन्ड रोड, अमरावती 444 601 याठिकाणी कार्यरत आहे. विद्यार्थ्यानी मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8308956236, 7620560125 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages