महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून 'मदर एनजीओ' निवडण्याची प्रक्रिया सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, December 13, 2025

महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून 'मदर एनजीओ' निवडण्याची प्रक्रिया सुरू


१५ डिसेंबरपर्यंत अर्ज करा

दि.१३ :महाराष्ट्रातील सर्व तालुकास्तरावरील स्वयंसेवी संस्थांना कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्त्व (CSR) निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र एनजीओ समितीच्या वतीने राज्यभरात मोठ्या प्रमाणात "मदर एनजीओ" निवड प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील सर्व ३५८ तालुक्यातून एक संस्था निवडून तिला "तालुका मदर एनजीओ" म्हणून मान्यता दिली जाणार आहे 

योजनेची प्रमुख कार्यक्षेत्रे:

या उपक्रमाद्वारे, निवडलेल्या मदर एनजीओकडे प्रत्येक तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रकल्पांसाठी निधीचे समन्वय, नियोजन, प्रकल्प सादरीकरण, ऑडिट प्रक्रिया, निरीक्षण आणि नवीन CSR प्रकल्पांची शिफारस करण्याची जबाबदारी असेल. प्रमुख कार्यक्षेत्रांमध्ये शिक्षण, आरोग्य व पोषण, महिला व बालविकास, पर्यावरण संवर्धन, कौशल्य विकास, ग्रामविकास, इत्यादींचा समावेश आहे 
अंतिम तारीख आणि नोंदणी:
या उपक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. CSR अंतर्गत काम करण्यास इच्छुक असलेल्या नोंदणीकृत एनजीओंनी आपली माहिती ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच, सर्व संस्थांनी राष्ट्रीय CSR विकास पोर्टलवर (nationalcsr.org) आपली नोंदणी करणे अनिवार्य असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी:
राज्यातील सामाजिक परिवर्तनासाठी CSR निधीचा जास्तीत जास्त लाभ ग्रामीण व तालुका स्तरावर जावा, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक संस्था अधिक माहितीसाठी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या ७०३८७०२८९६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात .

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages