Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

राष्ट्रीय लोक अदालत १३ डिसेंबर रोजी



अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

               त्यात दाखल व 'दाखलपूर्व' अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. या आयोजनाची विशेष बाब म्हणून त्याकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही व प्रकरणाचा अंतिम निकाल होतो.

तडजोडपात्र प्रलंबित खटले 'राष्ट्रीय लोकअदालत'मध्ये ठेवून तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच 13 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय लोकअदालत' समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा तसेच सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments