राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे ५ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, December 31, 2025

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे ५ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजन


            अमरावती, दि. १ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सन 2025-26 या वर्षातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागामार्फत करण्यात येणार आहे. ही क्रीडा स्पर्धा  दि. 5, 6 व 7 जानेवारी 2026 या  कालावधीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात या कार्यालयाच्या स्तरावरून विविध समित्या गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages