आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, December 31, 2025

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन



        अमरावती, दि. १ जानेवारी २०२६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी आधार नोंदणी केंद्रांचे वाटपाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती मार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता प्राप्त व सुरू असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले  आहे. अर्ज स्वीकृतीची तारीख दि. ३१ डिसेंबर २०२५ ते 09 जानेवारी 2026 ही आहे.

      वलगांव, तालुका अमरावती-1, आसरा, तालुका भातकुली -1, मंगरूळ चव्हाळा, तालुका नांदगाव खंडेश्वर-1, लोणी, तालुका नांदगाव खंडेश्वर-1, घुईखेड, तालुका चांदुर रेल्वे-1, जुना धामणगांव, तालुका धामणगाव-1, वऱ्हा, तालुका तिवसा-1, हिवरखेड, तालुका मोर्शी-1, लोणी, तालुका वरूड-1, पुसला, ता. वरूड-1, बेलोरा, ता. चांदुर बाजार-1, रासेगांव, ता. अचलपूर-1, वडनेर गंगाई, ता. दर्यापूर-1, भंडारज, ता. अंजनगांव सुर्जी-1, धुलघाट, ता. धारणी-1, हरिसाल, ता. धारणी-1, गौलखेडा, ता. चिखलदरा-1, टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा-1, असे एकुण 18 नवीन आधार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages