विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्याचे सुधारीत वेळापत्रक जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 17, 2025

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्याचे सुधारीत वेळापत्रक जाहीर



अमरावती, दि. १८ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी (De-nova Electoral Roll) तयार करण्याचे सुधारीत वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार महत्वाच्या टप्प्यांचे सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

मतदार नोंदणी अधिनियम, 1960 नुसार या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे आखण्यात आले आहे. त्यानुसार आता हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई ही दि. 28 नोव्हेंबर, 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या मतदार याद्यांवर 3 ते  18 डिसेंबर 2025 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती 5 जानेवारी 2026 रोजी निकाली काढण्यात येतील. याच दिवशी पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे. त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे, असे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी पत्राव्दारे कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages