Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन




 

अमरावती, दि.27 :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने काल  सकाळी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त रविंद्र हजारे, संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 76 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मुल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केले असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना डॉ. सिंघल यांनी उजाळा दिला.


Post a Comment

0 Comments