जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

 






अमरावती, दि. २७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने काल जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधीक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त इर्विन चौकात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, भारताचे संविधान हा एक देशाचा मजबूत पाया आहे. संविधानातील तरतुदींमुळे देशात शांतता नांदत आहे. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांला मुलभूत हक्क दिले आहे. त्यासोबतच कर्तव्येही दिली आहेत. नागरिकांना दिलेल्या अधिकारामुळे देशाने आज प्रगती केली आहे. समातनेमुळे देश विकसित राष्ट्र होत असल्याचे सांगितले.

सुरवातीला श्री. येरेकर यांनी इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. यावेळी श्री. येरेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिकरित्या वाचन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार टिना चव्हाण आदी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages