शिरजगाव कसबा: भव्य धार्मिक सोहळा! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 6, 2025

शिरजगाव कसबा: भव्य धार्मिक सोहळा!

  • शिरजगाव कसबा भक्तीमय!

    • भव्य 'श्रीमद् भागवत सप्ताह' आणि दि. ८ शनिवारला कार्तिक त्रिजठा रथोत्सवाची पर्वणी


    •                                                                             

       




      कार्तिक त्रिजठा भव्य रथोत्सव होणार लक्षवेधी!

      • शिरजगाव कसबा: (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) ६ नोव्हेंबर २०२५

      " दान धर्मम मोक्ष धर्मम.. मोक्ष प्राप्ती करिता सत्कर्म प्रमाणेच दानधर्म महत्त्वाचे " कथा वाचक हभप श्री सोपान महाराज मुंडे यांचे कथा मधील वक्तव्य " दरवर्षी प्रमाणे यंदाही शिरजगाव कसबा येथील कार्तिक स्वामी मंदिरात भागवत सप्ताहाला सुरुवात झाली असून कार्तिक स्वामी त्रिजटा उत्सवानिमित्त (Kartik Swami Trijata Utsav) उत्साह, भक्ती आणि लोकसंस्कृतीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. कार्तिक पौर्णिमेच्या (किंवा संबंधित तिथीच्या) निमित्ताने येथील प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली असून, शिरजगाव कसबा येथील कार्तिक स्वामी मंदिर परिसरातील आठवडी बाजार परिसरात कार्तिक उत्सवानिमित्त
      पवित्र कार्तिक महिन्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान कथा प्रवक्ता हभप श्री सोपान महाराज मुंडे , आळंदी देवाची यांच्या अमृतवाणीतून दररोज सायंकाळी ७ ते १० कथा प्रवचन होणार आहे. तसेच संपूर्ण कार्तिक महिन्यात रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत काकड आरती सुरू आहे.
    • दरवर्षी या गावात कार्तिक त्रिजेठेला येथे भव्य पारंपारिक रथोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासल्या जात आहे पंचकोशीतील गावातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक महिन्यातील समाप्ती सोहळा येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो गावातील कार्तिक स्वामी महाराज गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन महिलांकरिता फक्त एक दिवस कार्तिक पौर्णिमेचा असतो पण यावर्षी ग्रंथ पंचांग नुसार महिलांकरिता कार्तिक स्वामी महाराजांचे दर्शन वर्जित असल्याने महिलांना दर्शन घेता येणार नाही अशी माहिती कार्तिक स्वामी मंदिर संस्थान कडून देण्यात आली आहे. रथोत्सवाच्या मार्गावर आणि मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी जमल्याने, संपूर्ण कसबा परिसर 'कार्तिक स्वामींचा जयघोष' या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
    • जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्तिक त्रिजठा रथोत्सव या गावी होत असल्याने जिल्हा व स्थानिक प्रशासन रथोत्सव कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी नियोजन करीत पासून संबंधित गावातील ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते व सरपंच प्रवीण खेरडे यांच्या मार्गदर्शनात ग्रा.पंचायत कार्यालय कर्मचारी यांनी कार्तिक समाप्ती रथ उत्सवानिमित्त ग्राम स्वच्छता ,रथ उत्सव मुख्य मार्ग तसेच भाविकांच्या गैरसोय असुविधा होऊ नये याकरिता तयारीला लागली आहे त्या अनुषंगाने गावातील दर शनिवार भरत असलेला आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे यावर्षी शनिवार दिवशीच कार्तिक रथोत्सव समाप्ती असल्याने भाविकांना कोणतीही गैरसोय अडथळा निर्माण होऊ नये याकरिता शनिवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच प्रवीण खेरडे यांनी दिली महावितरण वीज कार्यालय सहायक अभियंता हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचाऱ्यांनी रथोत्सव मुख्य मार्गावरील विद्युत पुरवठा वीज प्रवाह तारांपासून अडथळा निर्माण होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आली असून शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन ठाणेदार महेंद्र गवई यांनी गावातील सर्व कार्तिक उत्सव मंडळांच्या पदाधिकारी व स्वयंसेवक कार्यकर्त्यांची शांतता मीटिंग घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे 
    • भागवत कथेची सांगता झाल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी कीर्तनाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. या धार्मिक सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे संगीताच्या माध्यमातून श्रीमद् भागवत कथेच रसग्रहण, ज्यामध्ये पावन कथावाचनासोबत भक्तिरसात चिंतन होणार आहे. दैनदिन कार्यक्रमात भागवत कथा, भजन-कीर्तन व कीर्तनकारांच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे. सप्ताहाच्या समारोप ८ नोव्हेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. .कार्तिक साई स्वामी मंदिर संस्थान अध्यक्ष विनायक गुर्जर यांनी सर्व भाविकांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे तसेच भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा शिरजगाव कसबा येथील या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घ्या आणि कार्तिक स्वामींचा आशीर्वाद मिळवा! असे आवाहन केले आहे.श्री. कार्तिक स्वामी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages