जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे १९, २० नोव्हेंबरला आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 5, 2025

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे १९, २० नोव्हेंबरला आयोजन

 



*सहभागासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन अमरावती येथे करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह येथे १९ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत महोत्सव घेण्यात येणार आहे.

युवा महोत्सव सांस्कृतिक आणि नवोपक्रम या संकल्पनेवर आधारित असणार आहे. यामध्ये श्री. शिवाजी विज्ञान उद्यान महाविद्यालयात नवोपक्रम ट्रॅक विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.

या महोत्सवात युवक-युवतींना विविध स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. सांस्कृतिक स्पर्धेतील लोकगीत आणि लोकनृत्यात १० जणांना सहभाग घेता येईल. लोकनृत्यासाठी रेकॉर्ड केलेले संगीत वापरण्यास परवानगी नाही. कौशल्य विकास स्पर्धेत कथालेखन (मराठी, हिंदी व इंग्रजी, १००० शब्दांत - सहभागी संख्या ३), चित्रकला (सहभागी संख्या २), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी - सहभागी संख्या २) आणि कविता (सहभागी संख्या ३) सहभागी घेता येणार आहे.

नवोपक्रम ट्रॅक विज्ञान प्रदर्शनात युवक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे अभिनव विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, डिझाईन फॉर भारत आणि हॅक ऑफ सोशल कॉज यावर आधारित उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी वयोमर्यादा ही १५ ते २९ वर्षांपर्यंत राहणार असून दि.१२ जानेवारी २०२६ रोजी वयाची गणना करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५  नोव्हेंबर आहे.

स्पर्धक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विहित नमुन्यातील इंग्रजीमध्ये ओळखपत्र, आधारकार्ड आणि जन्म तारखेचा दाखला, ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला माय भारत पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक विद्यापीठ समोर, मार्डी रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.

महोत्सवात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या युवक-युवतींची निवड विभागस्तरीय युवा महोत्सवासाठी आणि त्यानंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी केली जाईल. युवा महोत्सवात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages