शिरजगाव कसबा दिनांक ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
क्रीडा व युवक संचालनालाय पुणे तथा राज्य वेट लिफ्टिंग संघटना मार्फत नुकत्याच झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धा पुसद येथे पार पडली. यामध्ये ६ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
विभागस्तरीय शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री. बालमुकुंद राठी विद्यालयातील १७ व १९ वर्षाखालील १३ मुलींनी व ९ मुलांनी एकूण २२ मुलांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी वयोगट १७ मधून ३ व १९ मधून ३ मुलींनी विजेतेपद पटकाविले व ३ सिल्वर व ७ ब्रॉन्झ मेडल पटकावले. एकूण ६ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली आहे .त्यामध्ये कु.वेदांती थोराईत , ईश्वरी थोराईत , रुपाली खंडारे , लक्ष्मी अमझरे ,निधी दाभाडे , व राधिका उघडे. खेळाडूंनी राज्यस्तरावर भरारी मारून शाळेचा इतिहास कायम ठेवून संस्थेचे नाव उज्वल केले आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय राठी, उपाध्यक्ष श्यामसुंदर राठी,सचिव प्रशांत राठी व सर्व संचालक तथा मुख्याध्यापक सतीश सुरडकर यांनी वेटलिफ्टिंग प्रशिक्षक ज्ञानेश्वर नवलकर व सर्व खेळाडू यांचे अभिनंदन व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
Post a Comment
0 Comments