धान, भरडधान्य खरेदी नोंदणीच्या मुदतीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, November 28, 2025

धान, भरडधान्य खरेदी नोंदणीच्या मुदतीत १५ डिसेंबरपर्यंत वाढ

 




 

अमरावती, दि. २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान आणि भरडधान्य विक्रीसाठी शेतकरी नोंदणीच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून  ही मुदत वाढवून आता १५ डिसेंबर २०२५ केली आहे.

 ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झालेली नव्हती, त्यांना आता आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी १५ दिवसांचा वेळ मिळाला आहे. शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव राजश्री सारंग यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages